बिबटयाच्या वाढलेल्या मुक्त संचारामुळे मंडणगड तालुक्यातील बोरथळ येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबटयाच्या वाढलेल्या मुक्त संचारामुळे मंडणगड तालुक्यातील बोरथळ येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावाजवळच्या जंगलात बिबट्याचा वावर वाढला असून शेतात जाण्यासाठी आणि या रस्त्याने प्रवास करण्यासाठी नागरिक घाबरत आहेत.
आडे फाटा बोरथळ परिसरातील सुकोंडी, मुर्डी, चाचवळ, ताडाचा कोंड, आडे, लोणवडी , वाघिवणे , चांदिवणे,सातांबा ,कोंगळे आदी गावांच्या हद्दीत दिवसाढवळया बिबट्याचे दर्शन होत लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गावांच्या परिसरात बिबट्याचा वावर असला तरी त्याने हल्ल्या केल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र, दिवसाढवळ्या बिबट्याचा सचार वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button