
पारंपारिक मच्छिमारीला कृषीचा दर्जा द्या
महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि पारंपारिक मच्छिमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याची आग्रही मागणी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे कोळी महासंघाने केली. पारंपारिक मासेमारीला कृषीचा दर्जा नसल्याने कृषी मंत्रालयाने वेळोवेळी घोषित केलेल्या निरनिराळ्या योजनांपासून मच्छिमारांना वंचित रहावे लागते म्हणून शेतकरी व्यवसायाला मिळणार्या सुविधा पारंपारिक मासेमारांना ही मिळायला हव्यात यासाठी कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची, कृषी भवन येथील दालनामध्ये भेट घेतली. तोमर यांनी याबाबत प्रशासकीय अहवाल मागवून धोरण ठरविण्याचे आश्वासन दिले.
www.konkantoday.com