उडे देश का आम आदमी’ या अंतर्गत काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी सी-प्लेन सेवा सुरू रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे पर्यटनस्थळाचा समाविष्ट

जलवाहतूक, नागरी वाहतूक आणि पर्यटन या क्षेत्रात गेमचेंजर ठरू शकेल, अशा योजनेचा एमओयू केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. ‘उडे देश का आम आदमी’ या अंतर्गत दिल्ली, गुजरात, आसाम, तेलंगणा, आंध्र, महाराष्ट्र अशा राज्यांसह आणखी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे पर्यटनस्थळ यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे थेट जोडले जाणार आहे. हा प्रकल्प आणि वाहतूक पर्यावरणस्नेही आहे, हे सर्वांत महत्त्वाचे.काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग आणि मनसुख मंडाविया यांच्या उपस्थितीत बंदर, नौकावहन व जलवाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालय (एमओसीए)यांनी यासाठीच्या सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. सी प्लेन सेवा प्रकल्पांना चालना देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. संभाव्य विमान परिचालकांमार्फत विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) फर्मवर्क अंतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एमओपीएसडब्ल्यूच्या तत्त्वाखाली सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एसडीसीएल) तो कार्यान्वित करणार आहे. संभाव्य एअरलाइन्स ऑपरेटरची निवड प्रक्रियेद्वारे होणार असून एमओपीएसडब्ल्यू ठिकाणे निश्‍चित करेल. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आरसीएन-उडान उपक्रमाचा एक भाग म्हणून सी-प्लेन सेवा विकसित केल्या जाणार आहेत. एमसीए, आरसीएस-उडान योजनेंतर्गत निधी किंवा आर्थिक साहाय्य पुरवण्यात येणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button