विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे, ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा-आमदार अतुल भातखळकर

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणावरुन सभागृहात तुफान राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव अधिवेशनात मांडण्यात आल्यानंतर भाजप आमदार अध्यक्षांसमोरील हौदात उतरले. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्याचबरोबर अध्यक्षांच्या दालनातही मोठा राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दालनात भाजपचे आमदार आल्यानंतर त्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि आई-बहिणीवरुन शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोपही तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलाय. जाधव यांच्या या आरोपावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधवांवर जोरदार हल्ला चढवलाय.
विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे, ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे. शिवीगाळ करण्याचा इतिहास कोणाचा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button