
पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोटे येथे वृक्ष वाटप शिवसेना व युवासेनाचा उपक्रम
लोटे :माननीय पर्यावरण मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शाखा लोटे व युवासेना शाखा लोटे यांचे वतीने लोटेमाळ परिसरातील नागरिकांना ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे वाटण्यात आले या वृक्ष वाटणासाठी युवा सेना तालुका अधिकारी श्री चेतन वारणकर यांनी पुढाकार घेऊन युवा सैनिकांना सोबत घेतले व हा वृक्ष वाटपाचा कार्यक्रम यशस्वी केला यावेळी युवा सेनेचे रोहन कालेकर महेश हांजे सौरभ चाळके प्रसाद सावंत, धनंजय पटवर्धन सचिन कालेकर रुपेश काते सचिन काते लोटे चे सरपंच चंद्रकांत चाळके, सुरज काते उपस्थित होते या उपक्रमासाठी कृष्णा एंटीऑक्सीडेंट ,विनंती ऑरगॅनिक ,एक्सल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने सहकार्य केले
www.konkantoday.com