शहरातील लसीकरणाबाबत जिल्हाधिकार्‍यानी घेतले महत्त्वपूर्ण निर्णय ,आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण होणार

रत्नागिरी शहरातील लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे
शहरातील शासकीय रूग्णालय, झाडगाव आरोग्य केंद्र व कोकणनगर आरोग्यकेंद्र येथे लसीकरणासाठी नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती त्यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षित अंतराचे पालन होत नव्हते तसेच वादावादी चे प्रकार होत होते यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने शहरी भागासाठी लसीकरणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत उद्यापासून शहरातील लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस मिळणार नाही आतापर्यंत रांग लावून लसीकरण केले जात होते मात्र उद्यापासून त्यात बदल करण्यात आला आहे लसीकरण करणार्‍या नागरिकांना आता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर संबंधिताना मेसेज आल्यानंतरच त्याने त्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर जायचे आहे हा निर्णय फक्त शहरी भागातील लसीकरण केंद्रा साठीच घेण्यात आलेला आहे याबाबतचा सविस्तर माहिती लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी या जाहीर करणार आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button