
डांबरीकरण करण्यासाठी आणलेल्या डांबरला आग
रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेसाठी व गॅस पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सध्या सुरू आहे रत्नागिरी शहरातील अभ्युदय नगर येथील डांबरीकरणाचे काम सुरू आहे डांबरीकरण करण्यासाठी डांबर वितळण्यासाठी आगीवर ठेवलेल्या डांबराच्या पिंपांना आग लागल्याने या परिसरात धूर पसरला कामगारांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी अग्निशामक पथकाने जाऊन आग विझविली
www.konkantoday.com