
श्रीक्षेत्र गणपतीपुळे परिसरात येणारे भाविक, पर्यटक यांच्यासाठी एमटीडीसीमार्फत बांबू हाऊस उपाहारगृह
श्रीक्षेत्र गणपतीपुळे परिसरात येणारे भाविक, पर्यटक यांच्यासाठी एमटीडीसीमार्फत समुद्रदर्शनासह बांबू हाऊस उपाहारगृहाद्वारे उत्कृष्ट भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमटीडीसीतील सफाई कामगार सौ. विजया विष्णू ठावरे यांच्या हस्ते बांबू हाऊस उपाहारगृहाचे उदघाटन करण्यात आले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) बांबू हाऊस गणपतीपुळे समुद्रकिनारपट्टीवर वसलेले आहे. बांबू हाऊसमध्ये येणारे पर्यटक, भाविक यांना चविष्ट शाकाहारी, मांसाहारी, मत्साहारी भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भोजनाचा आस्वाद घेतानाच समुद्राचे दर्शन होणार आहे. उदघाटन समारंभाला एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक माने, व्यवस्थापक वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com




