
जिल्ह्यात १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पायलाग लसीकरण मोहीम
जनावरांचे पायलाग रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुधनांचे लसीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही नोंदणी जनावर दगावल्यास, पुरात वाहून गेल्यास किंवा ते चोरीला गेल्यास या टॅग क्रमांकावर पशुधन मालक निश्चिती करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पशुधन मालकांनी पुढे यावे, असे आवाहन पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. विवेक पनवेलकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजित कसालकर यांनी केले आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पायलाग लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
www.konkantoday.com




