
ग्राहकांना सुरक्षिततेचा ,माहितीचा ,, निवडीचा आणि ऐकून घेण्याचा अधिकार “न्या सुरेंद्र तावडे
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी काँग्रेससमोर १५ मार्च १९६२ रोजी ग्राहकांच्या हक्काची घोषणा केली. सुरक्षिततेचा , माहितीचा , निवडीचा आणि ऐकुन घेण्याचा अधिकार ग्राहकांना प्राप्त झाला .ब्रिटनमध्ये ग्राहक कायदा १९८७ मध्ये अमलात आला .भारतात ग्राहक पंचायतीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांनी १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांचेशी चर्चा करून ग्राहक चळवळीचा शुभारंभ केला असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायामुर्ति तसेच राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे यांनी रत्नागिरी जिल्ह्या बार असोसिएशन तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले .
आताचा ग्राहक कायदा सुलभ जलद आणि परवडणारा आहे परंतु आपण सर्वांनी ग्राहक म्हणून देखील सतत जागरूक असणे गरजेचे आहे .त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन केसमध्ये डॉक्टरांना ग्राहक कायद्याच्या कक्षेत आणले तर व्हि पी शांता केसमधील वैद्यकीय निष्काळजीपणा यावर विस्तृत भाष्य केले .
सुरवातीला बारचे अध्यक्ष अँड विलास पाटणे यांनी शाल श्रीफळ देऊन श्री तावडे यांचा सत्कार केला .तसेच प्रथम मान्यवरांनी लो टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले.
लौकीक गोष्टींचे नियंत्रण करणारी एक शक्ती या न्यायालयाच्या वर आहे हे लो टिळकांचे धीरोदात्त उदगार न्या छगला यांचे उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत कोरले गेले ही घटना अभिमानास्पद आहे .आकाश जरी कोसळले तरी त्यावर मी पाय देऊन उभा राहीन या टिळकांचं उद्गाराची आठवण बारचे अध्यक्ष ॲड विलास पाटणे यांनी करून दिली .
सुरवातीला अँड पाटणे यांनी श्री तावडे यांचा परिचय करून दिला तर प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव व जिल्हा न्यायाधीश अनिल अंबाळकर यांचे स्वागत ॲड निनाद शिंदे व ॲड शाल्मली अंबुलकर यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अँड रत्नदीप चाचले यांनी केले . या देखण्या कार्यक्रमाला न्यायवर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यावर जेएमएफसी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या नवोदित वकिलांना श्री सुरेंद्र तावडे यांनी अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केले. यावर्षी प्रथमच बारमधून ४७ वकील या परीक्षेला सामोरे जात आहेत .
निवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांचा सत्कार करताना बारचे अध्यक्ष ॲड विलास पाटणे , सोबत प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव जिल्हा न्यायाधीश अनिल अंबाळकर उपाध्यक्ष निनाद शिंदे .



