
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समिती बैठक
रत्नागिरी, दि. २५ ): राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.



