
कळंबणी हॅप्पी धाब्यासमोर दुचाकीचा अपघात; चालक गंभीर जखमी
खेड : कळंबणी येथील हॅप्पी धाब्यासमोर दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. ही घटना २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंबणीहून खेडच्या दिशेने दुचाकी क्रमांक एमएच ०८ एझेड १३६७ वरून प्रवास करणाऱ्या चालकाचे हॅप्पी धाब्यासमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत गणेश वजरे (वय २६, रा. कळंबणी स्वामील) हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतून जखमी गणेश वजरे यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तातडीने मदतकार्य केले.




