
लांजा पन्हाळे येथील अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवून तिला मातृत्व लादणाऱ्या प्रौढा विरुद्ध व त्याला सहकार्य करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
लांजा तालुक्यातील पन्हाळे येथील अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या सूर्यकांत कानडे व या कामी त्याला सहकार्य करणाऱ्या हसीना या महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील अल्पवयीन मुलगी ही हसीना हिच्या मुलीची मैत्रीण होती त्यामुळे त्यांच्या घरी जाणे-येणे होते हसीना च्या मुलीच्या गेल्यावर्षी वाढदिवसाच्या वेळी या अल्पवयीन मुलीची ओळख कानडे यांचे बरोबर करून देण्यात आली अल्पवयीन मुलगी कामानिमित्त मुंबई येथे गेली असता कानडे यांनी तिला मोबाईल करून आपल्या भायखळा येथील घरी बोलावून घेतले व तिच्याबरोबर अतिप्रसंग करून कुठेही न सांगण्याची धमकी दिली मुंबईत हा प्रकार वारंवार घडत होता मार्चमध्ये लोक डॉन मध्ये अल्पवयीन मुलगी लांजा येथे हसीना यांच्या घरी आली त्यावेळी आरोपी कानडे गावी आल्यानंतर ही या अल्पवयीन मुलीवर वारंवार अतिप्रसंग केल्याने ती गरोदर राहिली याशिवाय यातील हसीना हिने सदर मुलीला हिरव्या बांगड्या मंगळसूत्र घालण्याचा आग्रह केला शेवटी या पीडित मुलीने लांजा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com