
खडपोलीतील निकृष्ट पोषण आहार, ना. अजितदादांनी दिले चौकशीचे आदेश
गेले महिनाभर खडपोली येथील निकृष्ट पोषण आहार धान्याचा विषय गाजतो आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणार्या गोदाम मालक व पुरवठादारांवर कारवाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुरांद अडरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लढ्याला मोठे यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
www.konkantoday.com