नाटे येथे नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेने स्वच्छता अभियान यशस्वी

नाटे, ता. राजापूर |

*जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (दक्षिणपीठ, नाणीजधाम) यांच्या प्रेरणेने आणि प.पू. कानिफनाथ महाराज (उत्तराधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाटे येथे सामाजिक उपक्रमांतर्गत *स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात यशस्वी पार पडले*.

या अभियानात श्री नाटेश्वर व श्री नवलादेवी मंदिर परिसर आणि नाटे गावातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. सकाळपासूनच महिला भगिनी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” या महाराजांच्या संदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानाचे आयोजन तालुका सेवा समिती राजापूर यांच्या वतीने करण्यात आले होते.

या अभियानात उपस्थित मान्यवर व सेवेकरी:

या स्वच्छता मोहीमेला राजापूर पंचायत समिती सभापती सौ. नंदिनी कदम यांनी भेट दिली.

▪️या वेळी सौ. जान्हवी गावकर – पंचायत समिती सदस्य (अणसुरे गण) या सुद्धा सकाळपासून महिलांच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या.

यावेळी
▪️ श्री. संदीप बांदकर – ग्रामपंचायत नाटे सरपंच तसेच
▪️ डॉ. सुनील राणे (नाटे)
▪️ श्री. मकरंद धाक्रस – ग्रामपंचायत नाटे सदस्य
▪️ सौ. रचना खांबल (नाटे ग्रामपंचायत सदस्य)
▪️ श्री. नितीन बांदकर – नवलादेवी देवस्थान ट्रस्टी
▪️ श्री. सचिन बांदकर – भाजपा तालुका चिटणीस
▪️ श्री. राजेंद्र खांबल – मुख्य पीठ नाणीजधाम लेफ्टनंट जनरल
▪️ सौ. वैभवी हळदणकर – जिल्हा महिला अध्यक्ष
▪️ श्री. राजेश गुळेकर – जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख
▪️ श्री. सचिन पावसकर – तालुका सेवा अध्यक्ष
▪️ सौ. उषा भोसले – तालुका महिला अध्यक्ष
▪️ श्री. निळकंठ थळेश्री – जिल्हा तंत्रज्ञान प्रमुख
▪️ श्री. संतोष वाडकर (ता. सचिव)
▪️ श्री. नितीन कणेरी (ता. कॅप्टन)
▪️ श्री. नारायण गावकर (माजी तालुका सेवाध्यक्ष)

तसेच, रामानंद संप्रदायातील तालुका पदाधिकारी, सेवा केंद्र अध्यक्ष व पदाधिकारी, भक्तगण, नाटे गावातील ग्रामस्थ तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
B.Chava

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button