
वादावादीतून पत्नीने केला पतीच्या पायावर सुरीने वार
खेड सुसेरी येथे राहणारा कमलेश भांबड याचे आपली पत्नी सुजाता हिचेबरोबर वादावादी झाली. या वादावादीतून सुजाता हिने भाजी कापायच्या सुरीने फिर्यादीच्या ढोपरावर वार केल्याची घटना घडली आहे. यातील फिर्यादी कमलेश याच्या पत्नीचे गावातील एकाबरोबर प्रेमसंबंध होते. त्यावरून पतीपत्नीमध्ये अनेक दिवस वाद सुरू होते. फिर्यादी कमलेश याने कामावरून घरी आल्यानंतर आपली पत्नी सुजाता हिला तुझे आईवडील घरी आले होते काय? अशी विचारणा केली असता तिला राग येवून तिने घरातील चुलीजवळ भाजी कापण्याची सुरी आणली व फिर्यादीच्या उजव्या पायाच्या ढोपरावर वार करून जखमी केले. त्यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या फिर्यादीच्या आईवडीलांनाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
www.konkantoday.com