भाटे-पावस मार्गाची पोलिसांकडून पाहणी; अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश


रत्नागिरी : भाटे-पावस मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने अपघात प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘Operation TAPE For Safe’ या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी भाटे-पावस मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी रस्त्याची सद्यस्थिती, अपघातप्रवण ठिकाणे तसेच वाहनचालकांसाठी निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची पाहणी करण्यात आली. अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

वाहनचालकांची सुरक्षितता आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. पाहणीदरम्यान निश्चित करण्यात आलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भाटे-पावस मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने राखण्यासाठी ‘Operation TAPE For Safe’ अंतर्गत अपघातप्रवण मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button