
रत्नागिरी जिल्ह्यात अजून ७ कोरोना बाधित रुग्णांची वाढ
काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १६ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असतानाच आता मागील २४ तासात जिल्ह्यात आणखी ७ रुग्ण कोरोना बाधित आल्याचे प्राप्त झाले आहे.आता अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७७ इतकी झाली आहे.या सात जणांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते.हे रुग्ण खेड,चिपळूण,दापोली येथील आहे.यामुळे आता जिल्ह्यात एकूण करोना बाधीत रुग्णांची संख्या ११३ झाली आहे. आतापर्यंत ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ३ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७७ इतकी झाली आहे.
www.konkantoday.com