
सिंधुदुर्गच्या सीमेवर तपासणीसाठी प्रवाशी ७ ते ८ तास रांगेत ताटकळत उभे
यंदा कोरोनामुळे लॉकडाउनमध्ये काही चाकरमान्यांनी ई-पास व इतर सोपस्कार पूर्ण करत गावची वाट धरली आहे. काही दिवसांपासून वाहनांतून मुंबईकर कोकणात रवाना होत आहेत. मात्र, खारेपाटण या सिंधुदुर्गच्या सीमेवर तपासणीसाठी वाहने व प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांना ७ ते ८ तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. यात भरीसभर म्हणजे, तपासणीनंतर प्रवाशांच्या हातावर मारण्यात येणाऱ्या स्टॅम्पमुळे अनेकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.
हातावर मारण्यात येणाºया या स्टॅम्पसाठी नेमकी कसली शाई वापरली जात आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
www.konkantoday.com