
भाजपा युवा मोर्चा व महिला मोर्चा ऑनलाइन स्पर्धांचा निकाल आज 5 मे रोजी
भाजपा युवा मोर्चा व महिला मोर्चा रत्नागिरी शाखेने लॉकडाऊनच्या काळात चित्रकला, वक्तृत्व,निबंध,हेअर स्टाईल, रांगोळी स्पर्धा अशा ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन केले होते. दोन गटांसाठी झालेल्या या स्पर्धांचा निकाल आज 5 मे रोजी दुपारी 4 वाजता फेसबुकच्या माध्यमातून घोषित करण्यात येणार आहेत.भाजप महिला मोर्चा व भाजयुमो आयोजित सर्व ऑनलाइन स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला.
www.facebook.com/BJPRatnagiri
रत्नागिरी भाजपा – जिल्हा या फेसबुक पेजवर हे निकाल जाहीर होतील. सर्व स्पर्धकांनी हे निकाल पाहावेत, असे आवाहन भाजप सोशल मीडिया प्रमुख प्रवीण देसाई यांनी केले आहे.
www.konkantoday.com