मुख्यमंत्री मदत निधीसाठी चिरेखाण मालक संघटना सरसावली

मुख्यमंत्री मदत निधीसाठी ठिकठिकाणाहून मदतीचा हात दिला जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील चिरेखाण मालक संघटनेतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मदत निधीसाठी देण्यात आला आहे.
मदतीचा धनादेश प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी खाणमालक संघटनेचे प्रकाश जाधव, सुधीर देसाई, आनंद मयेकर, रोहित कोळवणकर, बाबाजी माने, उदय साळवी, अंकुश तांबे, अमित देसाई, दीपक पवार आदी सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button