
कोकणच्या मातीतला हिरा, आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात चमकला!
आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या कोंड्ये गावचा सुपुत्र प्रणव देसाई यानं आपल्या जिद्दीच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात भारताचा डंका वाजवला आहे.
जपानच्या आइची-नागोया येथे झालेल्या पाचव्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये पुरुषांच्या १०० मीटर टी-६४ स्पर्धेत प्रणवनं कांस्य पदक पटकावत देशाची मान उंचावली आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आज कोंड्ये येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रणवचा सत्कार करून त्याचं मनःपूर्वक अभिनंदन केलं.
प्रणवची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आजच्या युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्याच्या या यशानं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रणवच्या पुढील क्रीडा कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! भविष्यातही त्याच्या हातून अशीच गौरवशाली कामगिरी घडत राहो, हीच सदिच्छा व्यक्त करतो, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.




