दापोली मतदारसंघाचे आमदार राज्यमंत्री योगेश कदम यांचा गुडघे गावात आपुलकीचा मुक्काम

दापोली :- कोकणातलं कौलारू मातीचे घर शेणाने सारवलेल्या जमिनी माजघर, ओटी, पडवी, घरासमोरील अंगणात सुपारीचा मांडव या खास कोकणी थाटाच्या जुन्या घरात कोणातील दापोली मतदारसंघाचे आमदार राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुडघे गावात आपुलकीचा मुक्काम केला आहे.

शनिवारी रात्री सगळ्यांबरोबर माजघरातील सारवलेल्या जमिनीवर बसून ज्येष्ठ शेतकरी बागायतदार मिलिंद दांडेकर यांच्या घरातील माजघरात चक्क जमिनीवर बसून केळीच्या पानावरील चुलीवर केलेल्या आमटी भाताच्या रूचकर भोजनाचा मंत्र्यांनी आस्वाद घेतला. योगेश कदम यांचे अत्यंत साध्या आपुलकीच्या वागण्याने त्यांच्यातीलही साधा कोकणीमाणूस ग्रामस्थांना जवळून पाहता आला, अनुभवता आला व थेट अंगणातील बैठकीत संवादही साधता आला. त्यामुळे ही गावातील आपुलकीच्या मुक्कामातील पहिल्यांदाच झालेली ही भेट गावच्या इतिहासात नोंद करणारी ठरली.
कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक गो.नी. दांडेकर यांच्या दापोली तालुक्यातील गुडघे गावाची निवड नोव्हेंबर महिन्यातील आपुलकीचा मुक्काम या उपक्रमासाठी करण्यात आली. महिन्यातून एक दिवस एका गावात वास्तव्य करून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होता यावे, थेट संवाद साधत त्यांच्या समस्या थेट जाणून घेता आल्या महिन्यापासून आपुलकीच्या मुक्कामाअंतर्गत थेट मतदार संघाचे आमदार व राज्यमंत्री आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा त्यांचे मुंबईहून गावात आगमन झाल्यानंतर डोक्यावर टोपी अबीर गुलाल लावत टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रामस्थांनी वारकरी दिंडीने त्यांचे उस्फूर्तपणे गावात स्वागत केले. यावेळी योगेश कदम यांनीही वारकऱ्यांसमवेत डोक्यावर वारकरी टोपी घालून टाळ घेत पंढरीच्या विठुरायाच्या गजर करत ठेका धरला.
दांडेकर कुटुंबीयांनीही प्रथमच थेट राज्यमंत्री घरी वास्तव्याला आल्याने साध्या पद्धतीने पण पारंपरिक पद्धतीने औक्षण करून सुवासिनींनी स्वागत केलं. विशेष म्हणजे या दिंडीत योगेश कदम यांनीही सहभाग घेत ठेका धरला.
दांडेकर कुटुंबियांजवळ संवाद साधत ओळख करून घेत आजोबांनी बांधलेल्या तब्बल ८० वर्षांपूर्वीच्या या जुन्या घराची आपुलकीने माहिती घेतली. घरातील समोरच्या अंगणात थेट ग्रामस्थ बरोबर संवाद साधत खळा बैठकीत गावाची भौगोलिक माहिती घेत त्यांनी इतिहास जाणून घेतला. आपल्या मतदारसंघातील आपल्याच भागात असलेल्या गावाचे वैशिष्ट्य, इतिहास तेथील नागरिकांचे जीवनमान त्यांच्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातील अडचणी, प्रश्न हे थेट समजून घ्यावेत यासाठीच या गावाला भेट देत थेट वास्तव्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी योगेश कदम यांनी दिली.
आपल्या प्रत्येक गावाची माहिती आजच्या तरुण पिढीला ही असायला हवी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
गावकऱ्यांसमवेत झालेल्या खळा बैठकीत गावचा लिखित स्वरूपातील इतिहास असल्याची माहिती ज्येष्ठ माजी जि. प. सदस्य अनंत करबेले यांनी दिली. यावेळी चैतन्य दांडेकर यांनी गोळकोटचा ऐतिहासिक किल्ला व दाभोळ हे असलेले व्यापारी केंद्र होते. त्यावेळी या व्यापारी केंद्राची लूट होण्याचे प्रकार घडत. गोवळकोट किल्लेदारांकडे असलेले कारभारी दांडेकर यांनी व्यापारी केंद्राची लूट करून नेणाऱ्या जहाजांना अडवण्यासाठी समुद्रात साखळदंडाचा वापर केला तो गनिमी कावा यशस्वी झाला. आणि मग दांडेकरांना घोंगडीभर सूत सोडून जेवढा पसारा झाला तितके क्षेत्र हे गाव दांडेकर कुटुंबाला इनाम मिळाल. त्याकाळचे जोते आणि विहीर आजही पाहायला मिळते. तेव्हापासून मग दांडेकर, करबेले, चिपटे, पडयाळ अशी अनेक कुटुंब गावात एकत्र नांदायला लागली.
रामचंद्र बुवा दांडेकर हे राष्ट्रीय कीर्तनकार होते. ज्येष्ठ लेखिका वीणा देव यांची सुकन्या ज्येष्ठ अभिनेत्री असलेल्या मृणाल कुलकर्णी या गावातील नात मृणाल हिचे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ साहित्यिक गो.नी. दांडेकर त्यांचे हे मूळ गाव जन्मगाव हेच असल्याची माहिती चैतन्य दांडेकर व अनंत करबेले यांनी योगेश कदम यांना दिली. मतदार संघातील या गावाचा इतिहास जाणून त्यांनाही आनंद झाला. गाव इतिहासाची माहिती हवी म्हणून पुण्यातील पुरातत्त्व विभागाकडून लिखित स्वरूपात मिळवलेल्या दस्तऐवजाचीही प्रति आपण मिळवल्या आहेत अशी माहिती उच्चशिक्षण घेऊनही गावात शेती बागायती करणारे चैतन्य दांडेकर त्यांनी मंत्र्यांना दिली. ही सगळी माहिती कळल्यावर प्रशासनाला अशा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास असलेल्या गावांच्या माहितीची नोंद ठेवण्याच्या सूचना योगेश कदम यांनी केल्या.

अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून संगणकावर तयार केलेलं गावाचे गुगल मॅपही तिथे संगणकावर प्रेझेंटेशन कैवल्य दांडेकर यांनी दिले. येथील पाण्याचे स्त्रोत, जंगल परिसरात मिळणारी वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक घटक असलेली आयुर्वेदिक वनस्पती या वनस्पतीचा कॅन्सर या असाध्य रोगावर होणारा उपयोग ही खास माहिती देत या परिसराच बायोडायव्हर्सिटीचे महत्व चैतन्य याने अधोरेखित केल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button