राजस्थानमध्ये मिनी विधानसभेत काँग्रेसचा दणदणीत विजय


मिनी विधानसभा म्हणून समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपला जोरदार झटका दिला आहे. राज्यातील ३७ जिल्हा परिषदांपैकी काँग्रेसने तब्बल २४ ठिकाणी सत्ता काबीज केली आहे.तर ४१९ पंचायत समित्यांपैकी २६६ समित्यांवर पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये जणू शंभर हत्तींचे बळ संचारले आहे.

राज्यातील २०२८ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमधील विजय काँग्रेसला पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी बळ देणारा मानला जात आहे. याचपार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. गेहलोत यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रि‍पदासाठी आपली अप्रत्यक्षपणे दावेदारी सांगून टाकली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button