
सप्तलिंगी नदीकाठच्या शेतात फुलला विक्रमी कोहळा! ९ किलो २१४ ग्रॅम वजनाच्या कोहळ्याचे अण्णा बेर्डे यांच्या हस्ते अनावरण

देवरुख : क्रांती व्यापारी संघटनेचे सहसचिव, देवरुखमधील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आणि कुडवली येथील प्रगतिशील शेतकरी श्री. संदीप वेल्हाळ यांच्या सप्तलिंगी नदीच्या काठावरील शेतात पिकवण्यात आलेल्या विक्रमी कोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या कोहळ्याचे वजन तब्बल ९ किलो २१४ ग्रॅम इतके असून, त्याला २५० रुपयांचा भाव मिळाला आहे. कोकणातील शेतीत योग्य नियोजन, मेहनत आणि प्रयोगशील वृत्तीच्या जोरावर नवनवीन विक्रम घडवता येतात, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
या विक्रमी कोहळ्याचा अनावरण सोहळा क्रांती व्यापारी संघटनेचे सचिव आणि संदीप वेल्हाळ यांचे घनिष्ठ सहकारी श्री. नंदकिशोर उर्फ अण्णा बेर्डे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता त्यामध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादनाची गुणवत्ता आणि क्षमता वाढवण्याचा संदीप वेल्हाळ यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
सप्तलिंगीच्या सुपीक तीरावर फुललेला हा विक्रमी कोहळा म्हणजे मेहनतीला मिळालेली यशाची पावतीच!
श्री. संदीप वेल्हाळ यांचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रांती व्यापारी संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील शेती प्रयोगांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏




