शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान केल्याप्रकरणी शायना एन.सी. यांचा निषेध

राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन; जाहीर माफी मागण्याची मागणी

राजापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची प्रतिमा फाडून त्यांचा अवमान केल्याचा आरोप करत शायना एन.सी. यांच्या कृतीचा राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी संबंधितांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करणारे निवेदन राजापूर तहसीलदारांना सादर करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या छायाचित्राचा अवमान करणे ही शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी बाब आहे. अशा प्रकारच्या कृतीचा पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. शायना एन.सी. यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुका प्रमुख तथा उपशहरप्रमुख अभिजित तेली, उमेश कोळवणकर, उपनगराध्यक्ष विनय गुरव, माजी शहरप्रमुख अनिल कुडाळी, युवासेनेचे संतोष हातणकर, सुभाष नवाळे, विभागप्रमुख पिंट्या दूधवडकर, विभाग संघटक संगीता चव्हाण, शहर युवती प्रमुख प्रतीक्षा मांजरेकर आणि चव्हाण ताई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button