वाकेड ब्रिजवर भीषण अपघात; दोघे जखमी


पोलिसांची तत्परता; अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत


राजापूर, दि. १२ सप्टेंबर : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकेड ब्रिजवर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांना पोलिसांच्या मदतीने ॲम्बुलन्सद्वारे तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच वाकेड पोलीस मदत केंद्रातील अधिकारी व अंमलदारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तातडीने कार्यवाही केली.

दरम्यान, अपघातामुळे वाकेड ब्रिज परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटविली. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

सध्या वाकेड ब्रिजवरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button