
भाजपा रत्नागिरी शहर कार्यकारणीची मासिक सभा उत्साहात संपन्न; भगवान बिरसा मुंडा यांना करण्यात आले अभिवादन, शहर युवा मोर्चा कार्यकारणी जाहीर.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळ कार्यकारणीची मासिक सभा आज, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली.
या बैठकीला जिल्हा शहराध्यक्ष दादा ढेकणे, सरचिटणीस ओंकार फडके, , महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, सरचिटणीस निलेश आखाडे, मनोज पाटणकर,संदीप सुर्वे यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.➡️ बैठकीत या विषयांचा आढावा
बूथ कार्यकारणी, आगामी काळातील कार्यक्रम, मन की बात, SIR प्रक्रिया आणि 'अराजकता हटवा, लोकशाही वाचवा' या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे ठळक वैशिष्ट्ये सांगत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी 'अराजकता हटवा, लोकशाही वाचवा' या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
नियुक्त BLO 2 यांच्याकडून SIR प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. नियुक्त बूथ प्रमुख व कार्यकारणी याचा आढावा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी घेतला. एकंदरीत शहर मंडलातील कार्यक्रम व कामाचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी कौतुक केले.➡️ युवा मोर्चा कार्यकारणी जाहीर
या बैठकीचे मुख्य आकर्षण ठरले ते युवा मोर्चा कार्यकारणी जाहीर होणे. युवा मोर्चा शहराध्यक्ष अजिंक्य केसरकर यांनी शहर युवा मोर्चा कार्यकारणी जाहीर केली.व प्रमुख पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम जैन, युवा मोर्चा प्रदेश सचिव अद्वैत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीला शहर मंडलातील बूथ प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, युवा मोर्चा, महिला मोर्चा, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



