संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात


संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पंचक्रोशीतील नागरिकांसाठी वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, सध्या हे आरोग्य केंद्र विविध समस्यांनी ग्रासले आहे.आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब ठिकठिकाणी कोसळत असून इमारत धोकादायक बनली आहे. त्यातच रुग्णांच्या विविध तपासण्या मोफत करणारी महालॅब १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या प्रकारामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्थाही चिंताजनक आहे. इमारतीचा स्लॅब ठिकठिकाणी कोसळला असून काही ठिकाणी आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. स्लॅबचे तुकडे वारंवार कोसळत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब त्यावेळी ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली होती. सध्याची इमारतीची अवस्था पाहता केवळ दुरुस्ती न करता इमारतीच्या सुरक्षिततेबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button