
जेवणासाठी चुकूनही वापरु नका तेलाचे ‘हे’ ४ प्रकार, ह्रदयासाठी ठरते घातक, पाहा एक्सपर्टने दिलेली १० तेलांची अचूक रँकिंग!
Best Cooking Oil For Health : प्रत्येक घरात लोक स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहितेय का की,सर्वच प्रकारचे तेलं आरोग्यासाठी फायदेशीर नसते. काही तेलांच्या अतिसेवनाचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
यावर सर्टिफाइड न्यूट्रिशनिस्ट आणि वेट लॉस स्पेशलिस्ट लिमा महाजन यांनी आरोग्यासाठी कोणती तेलं फायदेशीर आहेत आणि कोणती मर्यादित प्रमाणात वापरली पाहिजेत, याची क्रमवार माहिती दिली आहे.
आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर खाद्य तेल
१) एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑयल: आरोग्यासाठी हे सर्वोत्तम तेलांपैकी एक मानले जाते. तज्ज्ञांनी जेवण बनवण्यासाठी या तेलाला पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे.
२) राइस ब्रान ऑयल (तांदळाच्या कोंड्याचे तेल): यात ‘गामा ओराइजेनॉल’ नावाचे शक्तिशालीy अँटीऑक्सीडेंट असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल टिकवून ठेवण्यास मदत करते. हे तेल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
३) मोहरीचे तेल: पारंपारिक भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे तेल आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. याला तिसरे स्थान मिळाले आहे.
४) शेंगदाणा तेल: हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. तज्ज्ञांनी याला चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे.
५) तिळाचे तेल : तिळाच्या तेलात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे याला पाचवे स्थान दिले आहे.
कोणते तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते?
६) सूर्यफूल (सनफ्लॉवर) ऑयल : यात ओमेगा-६ फॅटी एसिडचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे शरीरात जळजळ (सूज) वाढू शकते. हे उच्च आचेवर तापवणे किंवा वारंवार गरम करणे टाळावे.
७) तूप : तूप आरोग्यासाठी चांगले मानले जात असले तरी, यात सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणून याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
८) खोबरेल (नारळ) तेल : तज्ज्ञांच्या मते, रोजच्या जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर टाळावा. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) याला उत्तम कुकिंग ऑयल मानत नाहीत. यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर वेगाने वाढू शकतो.
९) सोयाबीन ऑयल : हे तेल अतिशय रिफाइंड असते आणि यात ओमेगा-६ फॅटी एसिडचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे शक्यतो याचा वापर टाळावा असा सल्ला दिला जातो.




