महात्मा फुले नगरमध्ये एल. पी. स्कूलच्या आवारात आग; अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवले नियंत्रण; नगरसेवकांसह ग्रामस्थांचेही मदतकार्य

खेड : खेड शहरातील महात्मा फुले नगर येथील एल. पी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या कंपाउंडमध्ये आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आणि तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे गटनेते श्री. निकेतन पाटणे, स्थानिक नगरसेविका सौ. आरती पवार तसेच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.
या आग नियंत्रण मोहिमेत खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव, सहाय्यक फायरमन प्रणय रसाळ आणि सूरज शिगवण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, सतर्कता आणि कर्तव्यदक्षतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणणे शक्य झाले. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button