खेडमध्ये वाड्याला भीषण आग; संपूर्ण वाड्यासह लाकडे जळून खाक

खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण; सुदैवाने जीवितहानी नाही

खेड : शहरातील ब्रह्मकुमारी मार्ग, लाला कडिया रोड परिसरात शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.४२ वाजण्याच्या सुमारास वणवा लागून एका बंद वाड्याला तसेच तेथे ठेवलेल्या लाकडांना आग लागली. या आगीत संपूर्ण वाडा आणि लाकडे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग विझवण्यात यश आले.
या अग्निशमन मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव आणि सहाय्यक फायरमन प्रणव घाग यांनी सहभाग घेतला.
सदर वाड्याचे मालक ऋग्वेद संदीप घडशी असून आगीमुळे वाड्यासह लाकडांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button