
खेड – महाडनाका येथील ८० वर्षीय वृद्धेचा आकस्मिक मृत्यु !
खेड : – शहरातील महाडनाका येथील नवानगर परिसरात राहणाऱ्या ८० वर्षीय लक्ष्मी गोविंद भोसले या वृध्द महिलेचा आकस्मिक मृत्यू होण्याची घटना शहरातील जगबुडी नदीच्या पात्रात सोमवार दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ :३० वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ., हि ८० वर्षीय वृद्धा कपडे धुण्यासाठी जगबुडी नदीच्या विसर्जन घाट येथे गेली होती. ती घरी परत न आल्याने तिचा शोध घेता, महाडनाका येथील गुलमोहर पार्क जवळील जगबुडी नदीच्या पात्रात पालथ्या अवस्थेत मृतावस्थेत पडलेली आढळुन आली. त्यांना कळंबानी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ८० वर्षीय लक्ष्मी गोविंद भोसले हिला मृत घोषित केले., या आकस्मिक मृत्युची खबर मयतीचा भाचा मनोज राजाराम मोरे (वय ४०, रा. पालेकर हाॅस्पीटल शेजारी, नवानगर, महाडनाका, खेड जि. रत्नागिरी ) यांनी येथील पोलीस ठाण्यात दाखल केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.




