
तांबळवाडीतील पाणीप्रश्न सुटणार; साडेसात लाखांच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार किरण सामंत यांच्या स्थानिक विकास निधीतून आरसीसी पाण्याची टाकी व पाईपलाईन उभारणार
राजापूर : राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथील हातणकरवाडी परिसरातील तांबळवाडी येथे आरसीसी पाण्याची टाकी आणि पाईपलाईन उभारण्यासाठी माजी आमदार किरण (भैया) सामंत यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या कामाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तांबळवाडी येथे पाण्याची टाकी आणि पाईपलाईन उभारल्यानंतर परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला राजापूर डोंगरी विकास समितीचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीशी (डीपीडीसी) संबंधित शिवसेना नेते रवींद्र नागरेकर, शिवसेना धोपेश्वर विभागप्रमुख जितेंद्र तुळसावडेकर, योगेश नकाशे, शाखाप्रमुख राजाराम दळवी, धोपेश्वर विभाग युवा प्रमुख प्रसाद हातणकर, ग्रामपंचायत सदस्य पुनाजी पाजवे, गावकर भिकाजी हातणकर, गंगाराम हातणकर, दशरथ हातणकर, वैभव हातणकर, योगेश राऊत, माजी सरपंच प्रभाकर हातणकर, यशवंत जड्यार, पांडुरंग हातणकर आणि शशिकांत जड्यार आदी उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून या विकासकामाचे स्वागत केले. स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या या कामामुळे तांबळवाडीतील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




