
श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय, फणसोप येथे जिल्हास्तरीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ उत्साहात संपन्न
रत्नागिरी : राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६ अंतर्गत जिल्हास्तरीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय, फणसोप येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेच्या माध्यमातून १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे सेवन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मुलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांची शारीरिक वाढ व बौद्धिक विकास योग्य प्रकारे व्हावा आणि जंतसंसर्गामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या टाळता याव्यात, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य गोळप गण श्रीमती अर्चना साळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल सूर्यवंशी, संस्थाध्यक्ष श्री. कमलाकर साळवी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेत्रा राजेशिर्के, जिल्हा परिषद रत्नागिरी च्या (PHN) श्रीमती प्रिया पेडणेकर, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रभारी विस्तार अधिकारी श्री. परशुराम निवेंडकर, डॉ. सिमीन मुल्ला, श्रीमती शितोळे, आरोग्य सहाय्यक श्री. चेतन शेट्ये, श्री. साळवी (लसीकरण सहनियंत्रक), आरोग्य सहाय्यक श्री. गजानन साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते. आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थ्यांना नियोजनानुसार जंतनाशक गोळ्यांचे सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
“निरोगी बालपण, सुदृढ भविष्य” या संकल्पनेतून जंतनाशक मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




