
पुढच्या 4 महिन्यामध्ये देशात काहीतरी मोठी गडबड…, राज ठाकरेंचा स्फोटक दावा
एक नीटचं आंदोलन झालं, निवडणूक आयोगाचं आंदोलन झालं. नीटच्या आंदोलनाच्या वेळी जी काही लोक बाहेर आली, त्यावेळी लोकांमध्ये एक राग आहे, त्या प्रत्येक रागाला समोर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म होता.
सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. अजून परिस्थितीत बेताची होणार आहे. हे सरकारला झेपणार नाही. मला असं वाटतं, मधला एक असा काळ येईल की देशाचा पंतप्रधान नसेल, पुढच्या ४ महिन्यात देशात काही तरी गडबड होईल”, असं भाकितच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे.
मुंबई प्रेस क्लबमध्ये ‘डान्स ऑफ डेमॉक्रसी’ या फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. . प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर बिश्नोईला जेलमधून बाहेर काढून मारलं पाहिजे
“साबरमती के संत तुने कर दिया कमाल, सुरक्षेतीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. जर हीच परिस्थितीत भाजप सत्तेत नसताना झाली असती तर विरोधात असताना भाजपने काय भूमिका घेतली असती. घटना तीच आहे, विरोधी पक्षात असताना आमची भूमिका वेगळी आणि सत्तेत असताना वेगळी हे कसं चालेल. जर ते छाती ठोकपणे सांगत असतील, जेलमधून बाहेर काढून नागडं करून मारलं पाहिजे. त्यांना भिती कशी नाही, कुणाची हिंमत होईल, असं म्हणत राज ठाकरेंनी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकऱणावर प्रतिक्रिया दिली
मुंबई पोलिसांना फ्री हँड द्या
मुंबई पोलिसांवर माझा शंभर टक्के विश्वास आहे, पोलिसांना फ्री हँड द्या, शुन्य लेव्हलवर क्राईम रेट आणतील. सगळ्या गोष्टी त्यांना माहित आहे. सगळी अंडी पिल्ली ते बाहेर काढतील, राजकीय हस्तक्षेप कमी करा, पोलिसांना हवं असेल तसं वापरलं जात आहे, हे थांबलं तर पोलीस नेटाने काम करतील.
फ्रान्स जळतंय, भारतातही लोकांचा राग थांबवू शकत नाही
“काही वर्षांमध्ये देशात साचलेल्या आहे, प्रत्येक जण आप आपला राग काढत आहे. फार काळ तुम्ही दबून राहू शकत नाही. पत्रकार सुद्धा दबून राहू शकत नाही. आज काही बातमी समोर आली. दिल्लीतील पत्रकार बोलू लागले आहे. प्रत्येकाचा एक एक राग आहे, घरातल्या स्त्रीचा राग आहे, तो बाहेर येत आहे. वसतीगृहांची फी, महागाई, सुरक्षेचा विषय आहे, तो बाहेर येत आहे. फ्रान्समध्ये जे घडतंय उगाच लोक आग लावत नाही. हनुमानाने उगाच लंकेत आग लावली नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी फ्रान्सच्या अराजकतेवर प्रतिक्रिया दिली
बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे
” पाकिस्तान आणि बांगलादेश पाहिला तर श्रीलंका आणि पाकिस्तान नेपाळ या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान होत आहे.
फ्रान्समध्ये मशीन आणली गेली. तेव्हा एका व्यक्तीने तक्रार केली, त्यानंतर मशीन बदलली गेली. अख्खं जग हो वोटिंग मशीनवर आहे, मग भारतात का ईव्हीएम मशीन असायला पाहिजे. निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. एका महिन्यानंतर निकाल लागला होता. आताही लोकसभेच्या निवडणुका या टप्पा टप्प्यात होतात, शेवटी निकाल हा उशिराच होतो. काही कारणं नाही.
४ महिन्यात देशात गडबड होईल
पुढच्या ४ महिन्यामध्ये देशात काहीतरी मोठी गडबड होईल एवढं नक्की आहे. देशामध्ये काही तरी बदल होणार आहे. हे आता थांबणार नाही. सरकार हे चुका करत राहणार. पुढच्या काही महिन्यात अख्खा देश रस्त्यावर आला तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. नीट आंदोलन झालं, तरुण पोरं बाहेर आली, ती काही नीटचा पेपर सोडून आली नव्हती. ती पोरं राग व्यक्त करण्यासाठी आली होती. आता राज्याची परिस्थिती पहिली तर सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. तर अजून परिस्थिती खराब होणार. आणि ते सरकार ला झेपणार नाही. अन्न धान्याची टंचाई येणार आहे. सरकारला हे झेपणार नाही. अनेक गोष्टी होतील . मला तर असं वाटतं थोडा काळ असा पिरियड येईल ज्यात देशाचा पंतप्रधानाच नसेल.




