वीज कामगार महासंघाकडून दुष्काळग्रस्तांना ५ लाखांची मदत


महाराष्ट्रात यावर्षी पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हाताशी आलेली पिके वाळल्याने आणि पिण्याच्या पाण्याची व चार्‍याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. या बिकट परिस्थितीत दुष्काळग्रस्त बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ पुढे आला असून, संघटनेच्या वतीने ’मुख्यमंत्री सहायता निधी’स ५ लाख (पाच रुपये देणगी जाहीर केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव, महामंत्री अरुण पिवळ यांनी घोषणा केली आहे. भारतीय मजदूर संघाची संलग्न संघटना असलेला महाराष्ट्र वीज कामगार महासंघ केवळ कामगारांच्या प्रश्नांसाठीच नव्हे, तर ’राष्ट्र प्रथम’ आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत आहे.
मागील वर्षी राज्यात निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीतही संघटनेने ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस दिली होती. त्याच परंपरेला जागून यावर्षीच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा व शासनाच्या पुनर्वसन कार्यात खारीचा वाटा उचलला जावा, म्हणून ही ५ लाख रुपयांची मदत पुनःश्च जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button