RRP Electronicsच्या विस्तारासोबत कोकणातही सेमीकंडक्टर उद्योगाची नवी संधी !

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी RRP Electronics Limited च्या महापे, नवी मुंबई इथल्या अत्याधुनिक Advanced Wafer-Level Packaging Facility च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सेमीकंडक्टर क्षेत्रात होत असलेली प्रगती अनुभवता आली, याचा मनापासून आनंद असल्याचे म्हटले.

त्यावेळी बोलताना, मराठी उद्योजकाने जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. RRP Electronics चे अध्यक्ष राजेंद्र चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहत असलेल्या या उद्योगासाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात उद्योगविस्तारासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील. उद्योगासाठी आवश्यक जमीन, पाणी, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली.

रत्नागिरीत उद्योग उभारण्याचा निर्णय घेतल्यास आवश्यक जागेबाबत दोन दिवसांत ऑफर लेटर देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी भूमिकाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्पष्ट केली.

सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार व्हावे, यासाठी MIDC च्या माध्यमातून स्वतंत्र कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

या केंद्रासाठी आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षणाच्या स्वरूपाबाबत पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक युवकांना कौशल्याधारित संधी या तीनही बाबींना प्राधान्य देत कोकणात नव्या औद्योगिक संधी निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
RRP Electronicsचा सध्याचा सुमारे २,००० कोटी रुपयांचा टर्नओव्हर भविष्यात २०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचावा आणि या यशस्वी वाटचालीत रत्नागिरीचाही महत्त्वाचा सहभाग असावा, हीच सदिच्छा असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button