विवेक भीमनवार रजेवर, राहुल गांधींनीही घेतली दखल; म्हणाले, आता भ्रष्टाचाराची चौकशी…

MPSC chairman latest news : पुण्यातील विद्यार्थी आंदोलनामुळे दबाव वाढल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील. तसेच विद्यार्थ्यांची इतर मागण्याही मान्य झाल्याने आंदोलना स्थगित करण्यात आले आहे.

आंदोलन यशस्वी झाल्याची दखल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत हा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. MPSC च्या अध्यक्षांना अखेर जावे लागले. आता भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होईल. हा विद्यार्थ्यांचा मोठा विजय आहे. हा युवकांचा मोठा विजय आहे. हा सत्याग्रहाचा मोठा विजय असल्याचे राहुल यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

MPSC के अध्यक्ष को आखिर जाना पड़ा – अब भ्रष्टाचार की पूरी जांच होगी।

ये छात्रों की बड़ी जीत है,
ये युवाओं की बड़ी जीत है,
ये सत्याग्रह की बड़ी जीत है।#Satyagraha

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 12, 2026

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आंदोलन स्थगित केले आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारच्या वतीने मध्यस्थी केली. विवेक भीमनवार यांचा राजीनामा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा राजीनामा शक्य नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

राजीनाम्याशिवाय विद्यार्थी माघार घेण्यास तयार नसल्याने अखेर भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री भीमनवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत आपण चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत आपण रजेवर जात असल्याचे जाहीर केले. ही पोस्ट विद्यार्थ्यांना आंदोलनाच्या ठिकाणी वाचून दाखविण्यात आली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

चौकशी समिती निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली असून धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे समितीचे सचिव असतील. या मागणीसह विद्यार्थ्यांच्या इतर मागण्याही मान्य झाल्या आहेत. समितीला अहवालासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत भीमनवार रजेवर असतील. या विद्यार्थी आंदोलनाची चर्चा देशभरात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button