️शाळेच्या बसवर झाड कोसळून चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना, 8 ते 10 मुलं गंभीर जखमी; बचावकार्य सुरू!

: मुंबईत वरुणराजाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली असून पावसाची संतताधार सुरू आहे. याच दरम्यान चेंबूर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेच्या बसवर अचानक झाड कोसळलं असून या दुर्घटनेत 10 मुलं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी बसने आपआपल्या घरी निघाले होते. घरी जात असताना चेंबूर परिसरात बस आली असता महाकाय झाड अचानक बसवर पडलं. या दुर्घटनेत ड्रायव्हरच्या बाजूची एक बाजू पूर्णपणे दबल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दुर्घटनेत 10 मुलं जखमी झाली असून एक विद्यार्थी अजूनही बसमध्ये अडकल्याचे वृत्त आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button