
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली युवकांसाठी अत्यंत मोठी घोषणा, आता खासगी कोचिंग क्लासेस..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देशवायियांना दिल्या. दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण झाले. नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार याकडे सर्वांच्यान नजरा होत्या.देशात जंतर मंतरवर मोठे आंदोलन युवकांनी केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा यांच्यासाठी मोठी घोषणा केली. यासोबतच भारत कशापद्धतीने महाशक्ती होणार, यावरही बोलताना ते दिसले. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, स्वप्ने मोठी पाहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वर्षाच्या आत एक कोटी तरुणांना एआय कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. यासोबतच त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसबद्दलही मोठे भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले, खाजगी कोचिंग क्लासेसमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठी आर्थिक बोजा पडत आहे. याकरिताच हे टाळण्यासाठी विविध परीक्षांचे मोफत ऑनलाईन कोचिंच क्लासेस उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली. म्हणजेच खासगी कोचिंग क्लासेसमध्ये जाणार पैसा आता वाचणार असल्याचे स्पष्ट आहे. सरकारतर्फे फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना क्लासेस करता येतील.नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, विकसित भारताच्या प्रवासात युवाशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आज मी लाल किल्ल्याहून देशातील तरुणांसाठी एक घोषणा करू इच्छितो. आम्ही येणाऱ्या 1 वर्षात 1 कोटी तरुणांना एआय काैशल्यांचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प आहे. जेणेकरून एआयच्या क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे असेल




