
रत्नागिरी येथे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून गावोगावी आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

मा पंचायत समिती सभापती प्रवीणजी पांचाळ साहेब मार्गदर्शन करताना.
रत्नागिरी : ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रत्नागिरी येथे तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेला जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मा. नंदकुमार मुरकर, पंचायत समितीचे सभापती मा. प्रवीण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, गटविकास अधिकारी श्री. चेतन शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेश साळवी, श्री. वैभव पाटील, श्री. महेंद्र झापडेकर, श्रीमती हर्षदा गावडे, श्रीमती श्रद्धा मोरे, पंचायत समिती सदस्य श्रीमती कांचन नागवेकर, श्रीमती पूर्वा दुर्गवळी, श्रीमती साक्षी कुमठेकर, श्रीमती स्वाती शिंदे, श्री. दादा दळी आणि श्री. स्वप्नील मयेकर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, नियमित आरोग्य तपासणी आणि ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अशा कार्यशाळांना महत्त्व आहे.
कार्यशाळेला तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रभारी आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले.



