भूजल पातळी २.९६ मीटरने खालावली; रत्नागिरीवर टंचाईचे सावट


रत्नागिरी जिल्ह्यावर यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने मारलेली दांडी आणि भूजल पातळीत २.९६ मीटरपर्यंत झालेली घट यामुळे आगामी वर्षात जिल्ह्यातील तब्बल १८३ गावे टंचाईच्या गर्तेत सापडण्याचा इशारा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या ताज्या अहवालातून दिला आहे.५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी १.२३ मीटरने खालावली आहे. यात रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २.९६ मीटरने विहिरींची पातळी खालावली आहे. त्यापाठोपाठ राजापूर (१.४७ मी.), गुहागर (१.४१ मी.), लांजा (१.१७ मी.) आणि चिपळूण (१.०१ मी.) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. एकूण ९ तालुक्यांपैकी रत्नागिरीतील ३७, संगमेश्वरमधील ३१ आणि राजापूरमधील २५ गावे सर्वाधिक बाधित होण्याचा अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button