
शेतकरी व व्यापारी संघटनेची आंबा घाटात अवजड वाहतूक सुरु करण्याची मागणी
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आंबा घाटातून अवजड वाहतुकीवर घालण्यात आलेली बंदी हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात यावी, या मागणीसाठी संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच आमदार शेखर निकम यांची भेट घेतली.
आंबा घाटातील अवजड वाहतूक बंदीमुळे शेतकरी व व्यापार्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्याचा आर्थिक फटकाही बसत असल्याची कैफियत यावेळी उपस्थितांनी आमदार निकम यांच्यासमोर मांडली. शेतकरी, व्यापारी व कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत आमदार निकम यांनी तात्काळ संबंधित अधिकांर्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच आंबा घाट मार्गाची पाहणी करून लवकरात लवकर अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
यावेळी पं. स. सदस्य मंगेश राष्ट्रवादी बांडागळे, महिला तालुकाध्यक्षा मानसी करंबेळे, संतोष पाल्प, महेंद्र गुरव, राजू मांडवकर, शशांक शिंदे, संकेत खामकर यांच्यासह शेतकरी, व्यापारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.




