ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये आकर्षक गार्डन साकारण्यात येणार


देवगड शहराच्या पर्यटन विकासाला आणखी एक नवी दिशा मिळणार असून, ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये आकर्षक गार्डन साकारण्यात येणार आहे. सुमारे १०० लाख रुपयांच्या निधीतून हे गार्डन विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी पर्यटनविकासाचा उपक्रम आकार घेत आहे.

देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये गार्डन वसविण्याची संकल्पना अत्यंत आकर्षक असून, यामुळे शहराच्या पर्यटन वैभवात आणखी भर पडणार आहे. हे गार्डन शासकीय जमिनीवर साकारले जाणार असल्याने जमीन उपलब्धतेची कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे.किल्ल्याच्या खंदकातून समुद्राचे दिसणारे विहंगम दृश्य हे या नव्या गार्डनचे विशेष आकर्षण ठरणार आहे. ऐतिहासिक वास्तू, हिरवाई, समुद्राचे निसर्गरम्य दृश्य आणि आकर्षक गार्डन यांचा अनोखा संगम पर्यटकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे या गार्डनमुळे देवगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button