शिवसेना ठाकरे गटाच्या राजापूर तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक विषयांवर चर्चा

राजापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीपजी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर तालुका कार्यकारिणीची बैठक आज राजापूर येथील शिवसेना शाखेत उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासह तालुक्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला तालुकाप्रमुख कमलाकर कदम, तालुका संघटक प्राची शिर्के, उपतालुकाप्रमुख नाना गोटम, अभिजित तेली, उमेश कोळवणकर, प्राजक्ता राऊत, श्रद्धा धालवलकर, उपनगराध्यक्ष विनय गुरव, माजी शहरप्रमुख अनिल कुडाळी, विभागप्रमुख नरेश शेलार, संतोष हातनकर, रुपेश नारकर, विलास नारकर आदी उपस्थित होते.
तसेच युवती शहरप्रमुख प्रतीक्षा मांजरेकर, विभाग संघटक मीनाक्षी गुरव, संगीता चव्हाण, मनाली करंजवकर, धनश्री मांजरेकर, उपविभागप्रमुख नामदेव नागरेकर, विजय मांडवकर, मल्लू कोल्हे, सुभाष पावणाक, संदेश पाटकर, अशोक कार्षिगकर, रामचंद्र कणेरी, गणेश गिरकर, श्री. चव्हाण, स्नेहल अफंडकर, रोशनी धुरी, सुप्रिया हातनकर आणि दीक्षा शेट्ये यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीच्या माध्यमातून राजापूर तालुक्यात पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button