
देवरुख ग्रामीण रुग्णालयामध्ये मिळणार्या सेवांबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांकडून अधिकारी धारेवर
देवरुख ग्रामीण रुग्णालयामध्ये मिळणार्या सेवांबाबत रुग्ण व नातेवाईकांमधून तीव्र नाराजी असंतोष व्यक्त होत आहे. येथील गलथान कारभाराची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांना मिळताच त्यांनी थेट सोमवारी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. प्रत्येक रुग्णाला चांगली सेवा मिळाली पाहिजे, कामकाजाचे योग्यप्रकारे नियोजन करा असे ठणकावून सांगत अधिकारी व कर्मचार्यांची कानउघडणी केली. नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेत रुग्णांसाठी असणार्या योजनांची माहिती दिली.
कोट्यवधी रुपये खर्च करुन रुग्णालयाची नुतन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र सोई सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे . मात्र सोई सुविधा नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे.




