
भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी रत्नागिरीच्या विक्रम जैन तर प्रदेश सचिव पदी रत्नागिरीच्या अद्वैत कुलकर्णी व मिलिंद नांदगावकर यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी रत्नागिरीच्या विक्रम जैन तर प्रदेश सचिव पदी रत्नागिरीच्या अद्वैत कुलकर्णी व मिलिंद नांदगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची नवीन घोषणा नुकतीच करण्यात आली असून, यामध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला विशेष प्राधान्य मिळाले आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मान्यतेने ही नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या नव्या नियुक्त्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी रत्नागिरीच्या विक्रम जैन तर प्रदेश सचिव पदी रत्नागिरीच्या अद्वैत कुलकर्णी व मिलिंद नांदगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे विक्रम जैन व अद्वैत कुलकर्णी या तरुण आणि धडाडीच्या चेहऱ्याला प्रदेश पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, यामुळे रत्नागिरी व कोकण पट्ट्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि प्रभारी सुनील राणे यांनी ही नवी टीम तयार केली असून, या सर्व नियुक्त्यांमुळे आगामी काळात राज्यातील युवा संघटना अधिक मजबूत होईल आणि तळागाळातील युवकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




