
सागरी समृद्धीला प्रदुषणाचा फास
रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा केवळ पर्यटन व मासेमारीपुरता मर्यादित नसून तो अत्यंत संवेदनशील सागरी जैवविविधतेचा आधारस्तंभआहे. दापोलीतील हर्णे, मुरुड, कर्वे, आंजर्ले, केळशी किनार्यांवर दुर्मीळ सागरी जीवांचे अस्तित्व सातत्याने नोंदवले गेले आहे. नुकतेच हर्णै किनार्यावर दुर्मीळ ’इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज’, अनेक वेळा समुद्री डॉल्फिनचे मृतदेह आढळल्याचे स्पष्ट झालेले आहे. तर काही वर्षांपूर्वी व्हेलमासा देखील मृतावस्थेत सापडून आलेला आहे.
हर्णे व आंजर्ले जवळील समुद्रात नुक नुकतेच ’इंडो-पैसिफिक फिनलेस पॉरपॉईज’ या दुर्मिळ सागरी सस्तन प्राण्याचे दोन मृतदेह आढळले यापैकी एक नर आणि दुसरे लहान पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधीही दापोलीच्या किनार्यावर जखमी व मृत डॉल्फिन आढळण्याच्या घटना घडल्या आहेत. समुद्रात फेकले जाणारे प्लास्टिक हे जीव अन्न अन्न समजून गिळतात किंवा तुटलेल्या जाळ्यामध्ये अडकून त्यांचा दम घुटतो, ज्यामुळे अशा दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरीच्या समुद्रात मासेमारी दरम्यान तुटलेली किंवा सोडून दिलेली प्लास्टिकची जाळी पाण्याच्या तळाशी साचून राहतात. ही जाळी सागरी प्राण्यांसाठी थेट फास ठरत आहेत. त्याचप्रमाणे, किनार्यावर येणार्या पर्यटकांकडून फेकल्या जाणार्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यात आणि रासायनिक कचर्यामुळे समुद्रातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून, माशांच्या प्रजननावर आणि स्थानिक मच्छीमारांच्या दैनंदिन उत्पादनावर याचा बेट प्रतिकूल परिणाम होत आहे वर्षभर किनार्यावरील कचरा व्यवस्थापनासाठी लागू करण्याची मागणी होत आहे.




