सुवर्णकन्या आकांक्षा कदमची वर्ल्ड कॅरम चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड


अवघ्या १३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवुन भारताचा तिरंगा फडकविणारी रत्नागिरी जिल्ह्याचा आणि अभिमान ठरलेली शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिने पुन्हा एकदा आपल्या क्रीडाकौशल्याचा डंका वाजविला आहे. येत्या २ ते ५ डिसेंबर दरम्यान इटली येथे रंगणार्‍या ९ व्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आहे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार्‍या आकांक्षाच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी तिचे विशेष अभिनंदन करीत पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
साखरपा येथील मूळ रहिवासी असलेल्या आकांक्षाने कमी वयात कॅरम बोर्डावर स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button